अनिल परबांच्या घरावर ईडीची कारवाई; ‘या’ ठिकाणी छापासत्र सुरू
![अनिल परबांच्या घरावर ईडीची कारवाई; 'या' ठिकाणी छापासत्र सुरू parab](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/parab-780x470.jpg)
मुंबई | ED Raids On Anil Parab House | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी (ED Raid) सुरू केली आहे. आत्तापर्यंत ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली आहे. तसंच ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
आज सकाळी ईडीने अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा (Ajinkytara) आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणावर छापा मारला आहे. या कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी आहेत. तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे सह-संचालक तासीन सुलतान (Tasin Sultan) देखील अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ED Raids On Anil Parab House
ईडीचा ‘या’ ठिकाणांवर छापा
- अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ
- मोनार्क इमारत, खासगी निवासस्थान, वांद्रे पूर्व
- अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचे छापे
- दापोलीतील साई रिसॅार्ट
- दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरूड येथील घरी
- दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरूडमधील कार्यालय