ED ने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात- बच्चू कडू
जळगाव – Bachchu Kadu On ED | शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या खाजगी आणि शासकीय निवासस्थानी ईडीने धाडी टाकल्या. पुणे, मुंबई आणि रत्नागिरीमधील (Pune, Mumbai and Ratnagiri) 7 जागांवर धाडी टाकत परबांच्या संपत्तीची 14 तास झडती घेतली. काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. या धाडीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
यावर बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही ईडीच्या (Bachchu Kadu On ED) कारवायांच्या धागा पकडत भाजपवर निशाणा साधला. ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात इतर राज्याच्या तुलनेत ईडीने महाराष्ट्रात किती धाडी टाकल्या यांचा आकडा केंद्र सरकारने जाहीर करावा, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारसाठी ईडी काम करत असल्याचंही कडू म्हणाले. यावर बोलताना, भाजपविरोधात लढण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.