ताज्या बातम्यापुणे

जिजामाता विद्यालयाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक

जेजुरी | श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून विद्यालयाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
राज्यस्तरावर शारदाबाई पवार विद्यालय माळेगाव तालुका बारामती व विभाग स्तरावर रा.प.सबनीस विद्यालय नारायणगाव हे पुढे गेल्यामुळे मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या जिजामाता विद्यालयाने जिल्ह्यातील २१०० शाळांना स्पर्धेत मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शासनाने राबविलेले शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम, कोणती शाळा अचूक राबविते यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली होती. विविध उपक्रमांची माहिती संकलित करुन शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या ॲपवर ही माहिती दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष शाळेची तपासणी झाल्यानंतर जिजामाता विद्यालयाने पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘सुंदर शाळे’ची स्पर्धा आयोजित केली होती. आठ दिवसांपूर्वी शासनाच्या शिक्षण विभागाच्या निरिक्षकांनी जिजामाता विद्यालयाला भेट देवून तपासणी केली होती.सर्व प्रकारचे शालेय उपक्रम राबविणारी जिजामाता विद्यालया हे एकमेव विद्यालय ठरले आहे.
जिजामाता विद्यालयाला पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर पर्यवेक्षक सतिश पिसाळ तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संस्थेचे सचिव व पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय .संजय जगताप साहेब, संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त माननीय राजवर्धिणी जगताप, संस्थेच्या विश्वस्त डॉ.अस्मिताताई जगताप संस्थेचे संस्थापक सचिव माननीय डॉ.एम.एस.जाधव साहेब, सहसचिव दत्तात्रय गवळी, व्यवस्थापक माननीय कानिफनाथ आमराळे यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी विद्यालयाच्या या यशा बद्दल प्राचार्य व सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये