‘आरटीई’ प्रवेशाबाबत केंद्रसरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतातातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश दिला जातो . यात प्रत्येकी वर्षी ५०%प्रवेश आज स्वीकारले जातात .तर शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९०६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.त्यासाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीमध्ये ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. तर प्रतीक्षा यादीत ६९ हजार ८५९ विद्यार्थी आहेत. सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया मंदगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत ३६ हजार ५०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाल्याचे दिसून आलं .
याच पार्शवभूमीवर ‘आरटीई’ आता २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. तर अनेक पालक, संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या प्रवेशासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्याच्या या मागणीवरून आता आरटीई ने २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ केल्याच प्राथमिक शिक्षण संचालक दीनकर टेमकर यांनी स्पष्ट केलं आहे.