मुख्यमंत्री बोलले की बोलायला लावलं! राहुल गांधींवरची टीका शिंदेनी “वाचून” दाखवली; चर्चेला उधाण
![मुख्यमंत्री बोलले की बोलायला लावलं! राहुल गांधींवरची टीका शिंदेनी "वाचून" दाखवली; चर्चेला उधाण Virat Anushka 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Virat-Anushka-1-780x470.jpg)
मुंबई : (Eknath Shinde On Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानं राज्यासह देशभर गदारोळ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी सर्व एका कागदावर लिहून देलेलं वाचून दाखवलं. त्यामुळे राहुल गांधींवर केलेली टीका वाचून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत होत.
यावेळी शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच आज आपण आणि राहुल गांधी स्वातंत्र्य उपभोगत आहेत. राहुल यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहावं, परंतु त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा कराव्यात ते वारंवार सांगतात, मी सावरकर नाही मी गांधी आहे. तुम्ही काय सावरकर होणार? त्यासाठी त्याग आणि प्रेम असावं लागेल.
तुम्ही परदेशात जावून देशाची बदनामी करता, त्यामुळे तुमच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं दैवत नसून संपूर्ण देशाचे दैवत आहेत. तरीही अधिवेशनात राहुल गांधींच्या विरोधात त्यांनी एकही शब्द काढला नाही. आम्ही विधानसभेच्या बाहेर केलेलं आंदोलन म्हणजे संताप आहे. चुकाच्या विधानांमुळे आलेली ती चीड आहे सावरकरांचं देशाप्रती जे काम आहे, त्यांच्या समर्पित भावाची आठवण म्हणून राज्यभर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंनी मालेगावमधील सभेत केलेल्या विधानावर शिंदे म्हणाले, ठाकरे म्हणाले, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. परंतु अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार आहात, हे उशिरा सुटलेले शहाणपण असतं त्या प्रमाणे हे बोलले गेले. फक्त बोलून काय होणार आहे, तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे, असं शिंदे म्हणाले.