ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे सरकारचा मोठा निर्णय-दोन वर्षानंतर महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात!

मुंबई : (Eknath Shinde Press Conference) गेल्या दोन वर्षांपासून देशात अनेक उत्सावांत कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं होतं. त्यामुळं राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यांसारखे सार्वजनिक सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास शासनाकडून काही मर्यादा घातल्यात आल्या होत्या. मात्र, यंदा राज्यातील सर्व उत्साह हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेश पालन करुन कोरोना निर्बंधमुक्त करण्याचे निर्देश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळं या वर्षीचे येणारे सण हे धुमधडाक्यात सजारी होणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह इथं या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात विविध समन्वय समित्यांसोबत बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गणेशोत्सव, दहीहंडीसह इतर सण व्यवस्थित पार पाडले जावेत यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आल्या आहेत. त्याचबरोबर मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत व्हाव्यात यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीनं परवानग्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही क्लिष्ट अटीशर्ती नसणार, यासाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही, याची सूट देण्यात आली आहे.

त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. पण नियमांबाबत बागुलबुवा निर्माण केला जाऊ नये अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत जी नियमावली आहे त्याप्रमाणं राज्यातही व्हाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविडकाळात गणेश मुर्तींच्या उंचीवर मर्यादा आणली गेली होती ती मर्यादा हटवण्यात आली आहेत असं देखील सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये