ताज्या बातम्यारणधुमाळी
बंड नाही ‘तर’ नाराजी, एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार!

मुंबई | Eknath Shinde Ready For Discussion – शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी घेतलल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती आहे.
दरम्यान, या चर्चेसाठी शिवसेनेतील कोणता नेता जाणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसंच गुजरातमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर हा दावा संजय राऊत यांनी खोडून काढला आहे.
मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे की किती आमदार बैठकीला हजर राहतात.