यंदा आषाढीचे मानकरी एकनाथ शिंदे!

मुंबई : बुधवार दि. २९ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्री आपल्या मुख्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, पुढं काय होणार हे अनेक राजकीय विश्लेषकांना समजणं कठीन झालं होतं.
राज्यात गेल्या ९ – १० दिवसांपासून चाललेल्या सत्ताकारणाचा शेवट झाला आहे. भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी बहुमताची ताकद दाखवत ही घोषणा केली आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षात आषाढी वारीकडे माध्यमांचे लक्ष कमी झाले होते. त्यामुळे आषाढी एकादशीला विठ्ठलाची पुजा कोणाच्या हस्ते होणार हा पेच प्रसंग भक्तगणांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, आज या संघर्षाचा शेवट झाला असे म्हणायला काही हरकत नाही. गुरुवार दि. ३० रोजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आषाढीला शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा होणार आहे.