ताज्या बातम्यारणधुमाळी

शरद पवार यांची भेट घेतली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

मुंबई | Eknath Shinde’s Revelation Regarding Sharad Pawar’s Visit – सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच या भेटीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता या फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत या फोटोबद्दल खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात पाडणार असून मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये