देश - विदेश

निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग, उद्या येणार ‘धनुष्यबाण’ चिन्हावर महत्त्वाचा निर्णय!

मुंबई : (Election Commission Shivsena party symbol tomorrow decision) बहुचर्चित आणि महिनाभरापासून प्रतिक्षित शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा? आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर उद्या काही तर ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला काही पुरावे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.

काल शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आले, त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून उद्या धनुष्यबाण चिन्हावर महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कालच दसरा मेळावा झाला आणि आत्ता लगेच उद्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निकाल येत असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये