मुख्यमंञी उद्धव ठाकरेंवर सोमय्यांचे गंभीर आरोप म्हणाले…

मुंबई : काल किरीट सोमय्या म्हणाले होतो की, आपण ठाकरे सरकारचे भ्रष्टाचार बाहेर काढणार यामुळे सर्वांचेच लक्ष लागले होैतो की, सोमय्या काय बाहेर काढणार आणि कोणावर आरोप करणार. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले आहे याची माहिती जनतेला द्यावी, असा गंभीर आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आता मुख्यमंञी या हल्ल्यात किती घायळ होतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
पुढे ते म्हणाले की, आपण नंदकिशोर चतुर्वैदी यांच्या कंपन्यांची यादी समोर आणली आहे. पण चतुर्वेदी गायब आहेत. त्यामुळे ते फरार आसल्याचे घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपन्या एकाच पत्त्यावर रजिस्टर असून, तेच चतुर्वेदी गायब आहेत. चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याबरोबर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचाही आरोप यावेळी सोमय्या यांनी केले आहेत.
मी एवढे आरोप करत आहे तरी, नंदकिशोर चतुर्वैदींबाबत मुख्यमंत्री ठाकरे गप्प का? असा सवाल देखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची श्री.जी. होम कंपनी असून, या कंपनीशी आपला संबंध काय हे देखील ठाकरे यांनी सांगण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. श्री.जी. होम कंपनीत 29 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचेही ते माध्यमांसमोर म्हणाले. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा नेमका काय संबंध आहे हे उद्धव ठाकरे यांनी सामान्य जनतेला सांगितले पाहिजे. ज्यांच्या बळावर तुम्हाला मुख्यमंञी पदाची खुर्ची मिळाली आहे.