Pune : FC रोडवर ग्राहकांवरुन दोन दुकानांतील कामगांमध्ये तुंबळ हाणामारी

पुणे | एफसी रोडवर ग्राहकांवरून दोन दुकानातील कामगारांमध्ये हाणामारी झाली. एकमेकांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरुन सुरू झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहचला आहे. ही सगळी घटना मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. भररस्त्यात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना ताब्यात घेतले.तुषार अल्हाट यांनी या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महेश मारुती नायक (वय 24), सूरज श्रीकांत कालगुडे (वय 21, अमित निलेश देशपांडे (वय 26), विशाल नरेश उर्किडे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक तुषार आल्हाट यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर छोट्या गल्लीत फेरीवाले व्यवसाय करतात. या परिसरात कपडे, पादत्राणे विक्रीची दुकाने आहेत. या दुकानातील कामगारांमध्ये ग्राहकांवरुन वाद झाला होता. त्यांना पोलिसांनी समज दिली होती. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्राहक दुकानात नेण्यावरुन कामगारांमध्ये वाद झाला. कामगारांमध्ये भररस्त्यात हाणामारी सुरू झाली. त्या वेळी पोलीस कर्मचारी तुषार आल्हाट, विशाल साडेकर गस्त घालत होते. त्यांनी भररस्त्यात सुरू असलेल्या हाणामारीचा प्रकार पाहिला. पोलीस कर्मचारी आल्हाट आणि साडेकर यांनी हाणामारी करणाऱ्या कामगारांना पकडले. त्यांच्या बरोबर असलेले कामगार पसार झाले.