दर्जेदार चवीच्या बासुंदी चहासाठी… आर्यन अमृततुल्य
आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा सुरू झाला की समोर येतो तो गरमागरम फक्कड असा चहा. चहाप्रेमी तर आपल्याला जिथे जाईल तिथे पाहायलाच मिळतात. तसंच आजकाल चहा पिण्यासाठी कोणतीही अशी ठरावीक वेळ पाहिली जात नाही. जशी तलफ होईल तसे चहाप्रेमी चहाचा आस्वाद घ्यायला जातातच. तर असे चहाप्रेमी एखाद्या प्रसिद्ध टी हाऊसच्या शोधात असतात तर अशाच चहाप्रेमींसाठी आर्यन अमृततुल्य प्रसिद्ध आहे.
आर्यन अमृततुल्य हे आर्यन रेणुसे यांचं टी हाऊस आहे. तसेच हे टी हाऊस शॉप नं. २०१, सावर साते, शंकर शेठ रोड, पुणे येथे आहे. विशेष म्हणजे आजकाल चहाचे वेगवेगळे प्रकारदेखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मग मसाला चहा, लेमन टी, बासुंदी चहा, इराणी चहा असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बासुंदी चहा. तर बासुंदी चहासाठी आर्यन अमृततुल्य प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे चहाप्रेमींची गर्दी नेहमी पाहायला मिळते.
आर्यन अमृततुल्यची स्पेशल बासुंदी चहा, चहा, कॉफी ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे या टी हाऊसमध्ये फक्त पुण्यातूनच नाही तर बाहेरून पुण्यात येणारे चहाप्रेमी देखील चहाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. आर्यन अमृततुल्यने त्यांच्या बासुंदी चहाची चव दर्जेदार ठेवल्याने येथे चहाप्रेमी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे तुम्हालाही चहाची तलफ झाली असेल, फक्कड, दर्जेदार चवीच्या बासुंदी चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून आर्यन अमृततुल्यला भेट द्या.