देश - विदेश

“…ते आम्हाला नका शिकवू”; युक्रेन धोरणावर परराष्ट्र मंत्र्यांचे पाश्चिमात्यांना सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : रशिया अंडी युक्रेन उद्धानंतर जगातील अनेक राष्ट्रांनी युक्रेनची बाजू घेतली होती, युरोपिअन युनिअन, अमेरिका यांनी इतर राष्ट्रांनाही तशीच भूमीका घ्यावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता. मात्र भारताने कोणतीही आजवर कोणाच्याही बाजूने भूमिका घेतली नाही. आज प्परात एकदा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या युक्रेन धोरणाबाबत पाश्चिमात्य राष्ट्रांना सडेतोड उत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या रायसीना डायलॉग 2022 मध्ये ते बोलत होते.

भारताने आपल्या स्वातंत्र्याची ७५वर्षे पूर्ण केली आहेत आणि आम्हाला ईतरांच्या मान्यतेची गरज आहे हे आता विसरून गेलं पाहिजे. भारताने युक्रेनबाबत काय भूमिका घेतली पाहिजे हे आम्हाला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे.

हिंसाचाराचा निषेध करत असून आणि युद्धबंदीचे आवाहन करून, भारताने रशियासोबतचे दीर्घकालीन व्यापारी संबंध कायम ठेवले आहेत. यावर पाश्चिमात्या देशांकडून टीका होत आहे, या पार्श्वभूमिवर बोलताना परराष्ट्रमंत्र्यांनी ही भूमिका मांडली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये