ताज्या बातम्यादेश - विदेश

माजी मुख्यमंत्र्यांना पहाटे तडकाफडकी अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Chandrababu Naidu | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना अटक करण्यात आली आहे. गाढ झोपेत असतानाच चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली. सीआयडीनं भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई केली आहे. 2021 मध्ये नायडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

चंद्राबाबू नायडू हे नंदयाल दौऱ्यावर होते. त्यावेळी पहाटे 3 वाजता त्यांच्या घरी सीआयडीची टीक धडकली. त्यानंतर चंद्राबाबूंना सीआयडीची टीम आणि नांदयाल रेंजचे डीआयजी रघुराम रेड्डी यांनी अटक केली. यादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तर चंद्राबाबूंच्या अटकेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

चंद्राबाबू नायडू यांना कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबूंनी 118 कोटींची लाच घेतल्याचा आरोप वायएसआर काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांनी केला होता. तसंच त्यांच्यावर 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील आहे. त्यामुळे चंद्राबाबूंना आज अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये