Top 5ताज्या बातम्यादेश - विदेश

Video : “जी 20 चे अध्यक्षपद भारताकडे आल्याने…”; पंतप्रधान नरेंद्र मोदी जी20 परिषदेत व्यक्त केले मनोगत

नवी दिल्ली (India’s G20 presidency in Bali) : आज G-20 शिखर परिषदेचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. ही परिषद इंडोनेशियातील बाली (Indonesia Bali G20 Summit) याठिकाणी पार पडली. आज इंडोनेशियाने G-20चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले आहे. 1 डिसेंबरपासून भारत नवी दिल्ली येथे G-20 गटाच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल. डिसेंबर 2022 मध्ये उदयपूरमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे. राजस्थानमधील तीन शहरे या गटाचे आयोजन करणार आहेत. जयपूरसह उदयपूर आणि जोधपूरमध्ये परिषदा होणार आहेत.

दरम्यान, G-20चे अध्यक्षपद भारताकडे आल्याने नरेंद्र मोदी यांनी G-20 सदस्यांचे आणि इंडोनेशियाच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत आणि मनोगतही व्यक्त केले आहे. ते म्हणाले- भारताचे G20 अध्यक्षपद सर्वसमावेशक आणि महत्त्वाकांक्षी असेल. पुढील वर्षभरात आमचा प्रयत्न असेल की G20 सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करेल. भारतातील विविध राज्यांमध्ये आम्ही परिषदा आयोजित करू. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. 1 डिसेंबरपासून भारत G20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.” असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये