देश - विदेश

“मंदिरात गेले प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला, अशी खडसेंची अवस्था”

जळगाव : (Girish Mahajan On Eknath Khadase) जिवनाच्या राजकीय संघर्षात अनेक वर्ष विरोधी बाकावर बसण्याची वेळ सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे याच्यावर आली. पण, ते डगमगले नाहीत त्या बाकावरूनही जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचे प्रमाणिक काम खडसे यांनी केलं. संघर्षानंतर २०१४ मध्ये देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं अन् अवघ्या दिड वर्षात त्यांच्यावर लाचखोरी, हप्तेबाजी, गुन्हेगारी संबंध ते जमीन घोटाळा असे एकापाठोपाठ एक गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आणि एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकामध्ये भाजपनं एकनाथ खडसे यांच तिकीट नाकारल्यामुळं ते नाराज झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना २० जुन रोजी विधानपरिषदेवर घेण्यात आलं. तर ०८ जुलै रोजी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.

आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेवर खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली अन् ‘मविआ’सरकार पडलं. त्यामुळे खडसेंची मंदिरात गेलं तर प्रसाद संपला आणि बाहेर आसं तर चप्पल चोरीला गेली अशी अवस्था झाली आहे अशी बोचरी टीका भाजप नेते गिरीष महाराज यांनी केली आहे. आता त्यांना आमदारकीवरच समाधान मानावं लागेल असं महाजन म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये