Todays Gold Rate : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर व्यवहार करत आहे.Todays Silver Rate : आज 1 किलो चांदीचा दर 67,880 रुपये इतकाआहे.लग्न सराई सुरु झाली असल्याने बाजारात सोनं खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळतेय.जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं – चांदी खरेदीकडे कल वाढवला आहे आणि त्याचमुळे सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय.याचा परिणाम असा की जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण झालेली दिसून येत आहे.बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा 56,470 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,764 रुपये आहे.