महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोन्याचा पिंजरा ः खा. सुळे
![महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोन्याचा पिंजरा ः खा. सुळे sule](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/sule-780x470.jpeg)
पुणे : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात काही तरी शिजतेय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोन्याचा पिंजरा लावलाय. उपमुख्यमंत्र्यांनी ४ वेळा मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविसंमेलनातील कवितांचा संग्रह शरदाचे चांदणे पुस्तक प्रकाशन सोहळा आणि पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग विभागाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप समारंभ आज पार पडला.
त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने, जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, काका चव्हाण उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मातृभाषा आपली आई आहे, मराठी साहित्य टिकलं पाहिजे, नवीन पिढी ही इंग्रजीकडे जात असल्याचे सांगितले.