ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“सत्ता गेल्यानंतर पवारांच्या घरातच…”; गोपीचंद पडळकरांची खोचक टिका!

 सांगली : (Gopichand Padalkar On Sharad Pawar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी आणि शरद पवार कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे. सत्ता गेल्यानंतर इतकी चुळबुळ निर्माण झाली आहे, की पवारांच्या घरातच उभी फूट पडते की काय असे वातावरण राज्यात निर्माण झाल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भावे नाट्यगृहात पार पडलेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. पडळकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीमधील अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत, पण सत्ता नसताना भाजपमधून कुणी फुटले नाहीत हे भाजपचे यश आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी “पाणी आडवा पाणी जिरवा” हा जलमंत्र देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त सांगलीच्या कृष्णा काठावरील समाधीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये