राज्यातील प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष – शरद पवार

पुणे | Sharad Pawar – राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रातून गेल्या सहा महिन्यांत किती कारखाने गुजरातला गेले, असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे येथील कार्यक्रमात उपस्थित केला. या वेळी इडीच्या भीतीने त्यांच्या पक्षातील सहकारी भाजपसोबत गेल्याचे सांगत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, कारखाने दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिकांची संधी देखील गेली, याचा विचार राज्यकर्त्यांनी केला आहे. असे म्हणत पवारांनी जोरदार निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, ‘अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते. मात्र, त्यांनी सांगितले मी काही केलं नाही. त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं, भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागतंय. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांना मतदार त्यांची जागा दाखवेल.
अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते. मात्र, त्यांनी सांगितले मी काही केलं नाही. त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं, भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागतंय. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांना मतदार त्यांची जागा दाखवेल, असंही शरद पवार म्हणाले.