ताज्या बातम्यामनोरंजन

‘झोपायला गेले ते परत उठलेच नाहीत…’ गुफी पेंटल यांच्यासोबत नेमके काय घडले?

मुंबई | बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल याचं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांचा पुतण्या हितेन पेंटल यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गुफी काकांचे निधन झाले. आमच्यासाठी ही सकाळ खूपच कठीण होती. ते बरे होत होते आणि आज अचानक त्यांचे निधन झाले. ते आज सकाळी उठले आणि आमच्याशी थोडावेळ बोलले आणि झोपायला गेले. त्यानंतर ते अजिबात उठले नाहीत. झोपेतच त्याचा मृत्यू झाला.’ इटाइम्सशी बोलताना हितेन यांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, हृदयक्रिया बंद पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला.

४ वाजता होणार अंत्यसंस्कार

पेंटल यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून अंधेरी याठिकाणी असणाऱ्या रुग्णायात उपचार सुरू होते. त्यांचे सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी पेंटल यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. पेंटल त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान जेव्हा गुफी यांची तब्येत बिघडली तेव्हा ते फरिदाबादमध्ये होते. त्यावेळी त्यांना तिथल्याच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आणि नंतर मुंबईत आणण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये