क्रीडा

नाद केला पण वाया नाही गेला! गुजरात टायटन्स यंदाच्या आयपीएलचे चॅम्पियन!

अहमदाबाद | आयपीएलच्या यंदाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गुजरात संघाने सहज विजय मिळवला आहे. 

नाणेफेक जिंकत राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांचा हा निर्णय गुजरातने चुकीचा ठरवला. राजस्थानची फलंदाजी चालली नाही त्यांनी गुजरातला 130 धावांचं लक्ष्य दिलं आहे. 

गुजरात संघाकडून हार्दिक पांड्याने 34 तर सर्वाधिक 45 धावा शुभमन गिलने काढल्या. त्यानंतर मिलरने वेळ न घालवता अवघ्या 19 चेंडूत 32 धावा केल्या. गुजरातच्या विजयाने आयपीएलला नवीन विजेता मिळाला आहे. 

दरम्यान, गुजरात संघाचा पहिला सीझन होता आणि हार्दिक पांड्यानेही पहिल्यांदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. मात्र तरीसुद्धा या संघाने विजयचा नौका पार केली. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये