ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

भाजपला गुजरात, काँग्रेसला हिमाचल, ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा…सगळं कसं एकदम ओके

गांधीनगर/शिमला : (Gujrat/Himachal Pradesh Assembly Election 2022) गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकालांचा कल दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट झाला आहे. गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक रेकोर्डब्रेक विजय संपादन केला आहे. तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. तर, बुधवारी दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये ‘आप’ला बहुमत मिळाले. पण, गुजरातमधील निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या आधारे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे भाजपला गुजरात, काँग्रेसला हिमाचल, अन् ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला त्यामुळे शिंदे गटाच्या भाषेत सांगायचे म्हटलं तर सगळं कसं एकदम ओके आहे असं म्हणावं लागेल.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसनेही निवडणुकीत फारसा जोर लावला नसल्याची चर्चा होती. तर, आम आदमी पक्षाने प्रचाराची राळ उडवून वातावरण निर्मिती केली होती. मात्र, भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला. काँग्रेसची दाणादाण उडाली असून आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेत 5 जागांवर आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला. भाजपला हिमाचल प्रदेशच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून आली. मात्र, काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे.

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने सुमारे 13 टक्के मिळाली आहेत. या मतांमुळे आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आप’ची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय मते घेतली होती. आता, गुजरातमध्येही 13 टक्के मते घेतलीत. त्याशिवाय, दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालात ‘आप’ने बाजी मारली. या निवडणुकीत ‘आप’ने चांगली कामगिरी करत बहुमत मिळवले. 250 जागा असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने 134 जागा आणि भाजपला 104 जागांवर विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये