“ज्याची बायको नांदत नाही तोही आमच्याकडं येतो” वादग्रस्त वक्तव्यावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
!["ज्याची बायको नांदत नाही तोही आमच्याकडं येतो" वादग्रस्त वक्तव्यावर मंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले… Gulabrao Patil 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Gulabrao-Patil-1-780x470.jpg)
जळगाव : (Gulabrao Patil Press Conference) शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलांनी जळगावातील एका कार्यक्रमात “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही आम्ही जनरल फिजीशियन असून ज्याची बायको नांदत नाही तोही आमच्याकडे येतो,” असं वक्तव्य केलं. शिंदे गटातील नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रोजी नवी-नवी वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत.
दरम्यान, त्यानंतर त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून टिका करण्यात आली आहे. तर जळगावात गुलाबराव पाटलांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. या वादावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्याविरोधात आंदोलन करणं हास्यास्पद आहे. ज्या चॅनलने ही बातमी दाखलवी त्यांच्याविरोधात मी हक्कभंगाचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्या भाषणाचा विपर्यास करून बातमी दाखवणे गुन्हा आहे”, असं ते म्हणाले.
“मी एवढंच म्हटलं की ऑर्थोपेडीक डाॅक्टर स्त्रियांच्या आजाराला तपासू शकत नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ ऑर्थोपेडीक रुग्णाला तपासू शकत नाही. अस्थीरोग तज्ज्ञ बालरोगाच्या रुग्णाला तपासू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की आमचं कामही डाॅक्टरप्रमाणेच आहे. आम्ही जनरल फिजीशियन आहोत आमच्याकडे सर्व तक्रारी घेऊन लोक येत असताना आणि आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो”, असं स्पष्टीकरण त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर केलं आहे.