चिंता सोडा आता ;केसांच्या गळतीची

आज-काल केस गळणे ही समस्या अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळून येते. केस गळणे, रुक्ष होणे, ते पांढरे होणे, टक्कल पडणे या सगळ्या समस्यांना वयाचे काहीएक बंधन राहिलेले नाही. स्त्री असो वा पुरुष असो दोघांनाही या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर ही समस्या अगदी लहान वयात निर्माण झाली तर तिचे मुख्य कारण हे अनुवांशिकता आणि पोषक घटकांची कमतरता असू शकते. वयोमानानुसार थोडेफार केस हे सगळ्यांचेच गळतात, पण त्यानंतर तिथे केस यायला हवेत. केस गळणे आणि नवीन केस येणे हा समतोल बिघडला की, केसगळतीचे परिणाम मुख्यत्वे आढळून येतात.
ढोबळमानाने याचे कारण बघितले तर अनुवांशिकता, ताणतणाव, हार्मोनल प्रॉब्लेम्स, पोषक घटकांची कमतरता आणि सगळ्यात महत्त्वाचे पाण्यात असलेल्या क्षारांचे प्रमाण. नवीन पिढीत या समस्येचे मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल उपचार पद्धती आणि केसांना केलेली केमिकल रंगांची रंगरंगोटी. चला तर मग काही सोपे उपाय जाणून घेऊयात. सर्वांत महत्त्वाचं केसांना आणि त्यांच्या मुळांना भरपूर प्रमाणात तेल लावण्याची गरज असते. आजकालच्या मुला-मुलींना ते बिलकुल आवडत नाही. त्यामुळे त्यांना पोषक घटक मिळत नाहीत आणि ते तुटतात.
जेवणात सर्व पोषक घटकांचा समावेश करून मुख्यत्वे हिरव्या पालेभाज्या, फळं आणि पाणी हे जर योग्य प्रमाणात जेवणात असेल तर व्हिटामिन डी जे केसांसाठी गरजेचे असते ते योग्य प्रमाणात केसांपर्यंत पोहोचले तर ते तुटत नाहीत.
ओले केस कधीही विंचरू नयेत
खूप केमिकल असलेले शाम्पू केसांना वापरू नयेत. ओले केस करकचून बांधू नये. ड्रायर योग्य प्रमाणात वापरणे. अती ड्रायरचा उपयोग केल्यास केस रुक्ष होतात.
केसांना मऊसूत करण्यासाठी एक अर्धा वाटी कोमट पाण्यात शुद्ध नारळाचे तेल आणि लिंबू पिळून त्यांनी केस धुण्याच्या तीन तास अगोदर केसांना मसाज करावा.
शक्यतोवर केसांना डाय, ब्लिच, विविध कलर वापरू नयेत.
केसांवर घ्यायच्या असलेल्या ट्रीटमेंटचे साइड इफेक्टने केस गळती होणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे किंवा केस रुक्ष होणे आणि सगळ्यात महत्त्वाचे टक्कल पडणे अशा सगळ्या समस्या जाणवू शकतात. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणतीही केसांची ट्रीटमेंट घ्यावी. होमिओपॅथिक उपचार पद्धतीत केसांच्या विविध समस्यांवर अनेक उपाय आहेत. केस कशाने गळतात हे होमिओपॅथिक डॉक्टर शोधून काढून त्यावर योग्य औषधे देऊन तुम्हाला पूर्णपणे
डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, एमडी होमिओपॅथिक मेडिसीन्स