बॅक टू नेचर

किडनी खराब होणे

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते. मात्र कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते. दोनपैकी एक किडनी निकामी झाल्यास किंवा अन्य कारणामुळे शरीरातील एक किडनी काढल्यास त्या स्थितीला किडनी फेल्युअर म्हणता येणार नाही. साधारणपणे जेव्हा रुग्णाची एक किडनी पूर्णपणे खराब होते तेव्हा दुसरी किडनी ही दोन्ही किडन्याचे काम करते. मात्र जेव्हा दोन्हीही किडन्या फेल होतात तेव्हा त्या स्थितीस किडनी फेल्युअर असे म्हणतात.

किडनी निकामी होण्याची कारणे – Kidney failure causes :
क्रॉनिक किडनी फेल्युअर होण्यासाठी मधुमेह (डायबेटीस) आणि हाय ब्लडप्रेशर ही दोन प्रमुख कारणे ठरत आहेत. अनियंत्रित मधुमेह आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास क्रोनिक किडनी फेल्युअर होण्याचा धोका जास्त असतो. किडनीला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात बाधा निर्माण झाल्यामुळे किडनी फेल होऊ शकते. किडनीतील मूतखड्यामुळेही किडनी फेल्युअर होऊ शकते. क्रोनिक ग्लोमेरुलोने फ्रायटिसचा आजार असल्यास यामध्ये चेहरा आणि हातांवर सूज येते दोन्ही किडन्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात. इन्फेक्शनमुळे, रासायनिक खते, किटकनाशके युक्त आहार, अन्नभेसळ, आहारात वापरली जाणारी रंगे यांमुळे आपल्या किडनीवर घातक परिणाम होतो. मद्यपान, धुम्रपान व्यसन करणाऱ्यांनाही किडनी फेल होण्याचा धोका अधिक असतो. काही अँटिबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे (पेनकिलर्स) यांच्या अतिवापरामुळे किडनी फेल्युअर होण्याचा धोका असतो. किडनी खराब झाल्यास हे करतात उपचार – kidney failure treatments : उच्च रक्तदाब किंवा मधुमेहामुळे किडनी खराब झाली असल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना केली जाते. तसेच रुग्णाच्या स्थितीनुसार किडनी निकामी झाल्यावर डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे उपचार केले जातात.

-अनिल काळे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये