आरोग्यबॅक टू नेचर

पावसाळ्याच्या दिवसात दररोज प्या ‘हळदीचे दूध’

अनिल काळे|

सध्या पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. यामुळे आपल्या आहारामध्ये देखील बदल केला पाहिजे. पावसामुळे अनेक अनेक आजारांची लक्षणे आपल्यला दिसून येतात. यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामध्ये हळदीचे दूध आपल्यला फार फायदेशील ठरत आहे. हळदीचे दुध सर्दी, खोकला, फ्लू, जखमा, सांधेदुखी आणि इतर आजारांवर उपचार करण्यास मदत करते. याशिवाय हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. तसेच हृदयाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. या दुधाचा आहारात समावेश करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

विशेषतः थंडीच्या वातावरणात हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर, सर्दी खोकला व्हायरल फ्लू पावसाळ्यातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही या काळात हळदी दुधाचे सेवन करू शकता. हळद हे आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते. हळदीमध्ये जंतुनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. आणि दूध हे कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो. जेव्हा हे दोन्ही एकत्र मिसळले जातात तेव्हा त्यांचे गुणधर्म आणखी वाढतात. हळद दुधामध्ये कॅल्शियम, लोह, सोडियम, ऊर्जा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरालाअनेक समस्यांपासून वाचवता येते.

हळदीमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. अनेक अभ्यासानुसार हळदीचे नियमित सेवन केल्याने कर्करोगापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे. हळदीचे दूध कर्करोगाच्या पेशी आणि ट्यूमरची वाढ थांबवण्याचे काम करते. हळदीमध्ये अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

हळदीचे दूध सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यास मदत करते. या समस्येत अनेकदा हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीचे दूध घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून त्वरित आराम देते. याच्या नियमित सेवनाने सर्दी-खोकला दूर होतो. बदलत्या ऋतूंमध्ये ही समस्या अनेकदा भेडसावत असते. अशावेळी तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करू शकता. अनेक वेळा अंगदुखी आणि पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी हळदीच्या दुधाचे सेवन करावे. हे पाठीचा कणा आणि सांधे मजबूत करण्यास मदत करते आणि वेदना कमी करते. वजन कमी करण्यास मदत करते. हळदीचे दूध आतडे निरोगी ठेवते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये