“बोलताना आता ‘हॅलो’ नाही म्हणायचं, तर…”; अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्र्याचा मोठा निर्णय
!["बोलताना आता 'हॅलो' नाही म्हणायचं, तर..."; अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्र्याचा मोठा निर्णय png 20220815 005810 0000](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/png_20220815_005810_0000-780x470.png)
मुंबई : शिंदे गट आणि भाजपने सत्तास्थापन करून दीड महिन्यापर्यंत प्रलंबित राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार केला. त्यानंतर ६ दिवसांनी आज खाते वाटपालाही मुहूर्त मिळाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आपल्या खात्याचा कार्यभार चांगला सांभाळतील असं आश्वासन देखील दिलं आहे.
दरम्यान, खाते वाटपाच्या पहिल्याच दिवशी नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सव’च्या पार्श्वभूमीवर आजपासून शासकीय कार्यालयांत बोलताना ‘हॅलो’ ने सुरूवात करता ‘वंदे मातरम’ म्हणत सुरुवात केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
अठराव्या शतकात फोनवर बोलण्याची सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्यासाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे आणि ऊर्जा देणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. येत्या 18 तारखेला याबाबतचा अधिकृत जीआर काढणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.