सिटी अपडेट्स

दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावर फुलला आनंद

कोथरूड : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ’द पूना स्कूल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या ९५ अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप, भोजन कार्यक्रम आणि फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते.

प्रशांत जगताप म्हणाले, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यर्थिनींच्या चेहर्‍यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता’.‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले.

यावेळी शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर, केदार कुलकर्णी, शेखर तांबे, सौरभ ससाणे, ओंकार शिंदे, सुनील हरळे, किशोर भगत, मधुकर भगत, ऋषिकेश शिंदे, श्रीकांत भालगरे, ऋषिकेश कडू, अजु शेख आदी सहकारी उपस्थित होत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये