Himachal Pradesh Election Result : काँग्रेस पुन्हा आघाडीवर, भाजपसोबत अतितटीचा सामना

शिमला | Himachal Pradesh Election Result 2022 – सध्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. हिमालय प्रदेशाच्या राजकीय इतिहास डोकावून पाहिलं तर तेथील जनता प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या पक्षाच्या हातात सत्ता देते. त्याला अपवादात्मक एक उदाहरण सोडलं तर आजपर्यंत या राज्यात पाच वर्षापेक्षा जास्त काळ कधीही सत्तेत राहिला नाही. मागील निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजपला या निवडणुकीत काँग्रेस धूळ चारणार का? की पुन्हा विजय संपादन करून इतिहास बदलला जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या काँग्रेस आघाडीवर असून त्यांना ही आघाडी कायम ठेवता येते का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सध्या 32 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये सध्या अतितटीचा सामना सुरू आहे.
भाजपच्या बड्या नेत्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. तसंच काँग्रेसच्याही बड्या नेत्यांनी या राज्यात जोमात प्रचार केला होता. एक्झिट पोलनुसार येथे भाजपला 24 ते 34 आणि काँग्रेसला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे.
One Comment