‘अवतार 2’ ठरला देशातील दुसरा मोठा हॉलिवूड ओपनिंग चित्रपट; पहा किती आहे दोन दिवसांची कमाई

मनोरंजन : (Avatar Movie Collection) ‘अवतार 2’ हा हॉलिवूड चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड कमाई करत आहे. (Avatar 2 Collection in India) पहिल्याच दिवशी ‘अवतार 2’ हा भारतातील दुसरा सर्वात मोठा हॉलिवूड ओपनिंग चित्रपट ठरला. (Avatar 2 Big Opening Hollywood Movie In India) चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा पार केला आहे. पहिल्या वीकेंडमध्ये त्याची कमाई जोरदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Hollywood Avatar 2 Movie Collection In India Entertainment News james cameron)
हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या जेम्स कॅमेरूनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला चकित केले आहे. चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘अवतार’नंतर आता जेम्सने त्याचा सिक्वेल ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ बनवला आहे. ‘अवतार 2’ शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची क्रेझ पहिल्या दिवसापासूनच जगभरात पाहायला मिळत आहे.
2009 मध्ये ‘अवतार’ने पॅंडोराचे काल्पनिक जग इतक्या भव्य शैलीत पडद्यावर सादर केले की लोक डोळे चोळत सुटले. 13 वर्षांनंतर लोकांना पुन्हा एकदा पडद्यावर पॅंडोरा पाहायला मिळत आहे आणि ज्याप्रकारच्या रिव्ह्यूस या चित्रपटाला मिळत आहेत, त्यावरून चाहत्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेचे फळ मिळाल्याचे दिसते. ‘अवतार 2’ ला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे, ज्या लोकांनी पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला आहे त्यांनीही ट्विटरवर चांगलेच वातावरण निर्माण केले आहे. भारतातील या वातावरणाचा फायदा ‘अवतार 2’च्या व्यवसायाला मिळत आहे.
शुक्रवारी या चित्रपटाने 41 कोटींच्या कलेक्शनसह शानदार ओपनिंग केली होती. या कमाईसह ‘अवतार 2’ हा भारतातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग हॉलीवूड चित्रपट ठरला आहे. त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन फक्त मार्वलच्या ब्लॉकबस्टर हिट ‘अॅव्हेंजर्स: एंड गेम’च्या मागे आहे.
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, ज्याला ‘अवतार 2’ म्हटले जात आहे, त्याने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर घबराट निर्माण केल्याचे संकेत शनिवारी बॉक्स ऑफिसच्या अहवालावरून मिळत आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 45 ते 47 कोटींच्या दरम्यान पोहोचले आहे. म्हणजेच अंतिम आकडे आल्यावर ‘अवतार 2’चे दोन दिवसांचे कलेक्शन 90 कोटींच्या अगदी जवळ दिसेल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.