महाराष्ट्ररणधुमाळी

अशा प्रकारे माविआ चा गेम; फडणवीस ठरले किंगमेकर- वाचा सविस्तर

मुंबई : (Rajya Sabha Kingmaker On Devendra Fadnavis) (दि. १० शुक्रवारी) रोजी राज्यसभेचं मतदान पार पडलं, आणि भाजपनं माविआ च्या तीन मतांवर आक्षेप घेतल्यानं निकाल प्रक्रियाला उशिर झाला. मात्र, पहाटं चारच्या सुमारस निकालचं सर्व चित्र स्पष्ट झालं. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना केवळ ३३ मतं पडली, तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मतं पडल्यानं त्यांचा विजय झाला आहे. या विजयाचे किंगमेकर हे फडणवीस ठरले आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या निमित्तानं भाजप आणि माविआ यांच्यात तीन-दोन असे चित्र स्पष्ट होते. मात्र, सहाच्या जागेसाठी दोन्ही पक्षात मोठी चुरस पहायला मिळाली. त्यात १३ अपक्ष आमदार हे माविआ च्या बाजूनं असल्याचं बोललं जातं होतं, पण ऐनवेळी शिवसेनेची अपक्ष आमदारांनी गोची केल्यानं शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना केवळ ३३ मतं पडली, तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मतं पडल्यानं त्यांचा विजय झाला आहे.

त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांच्या कौशल्याचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यात माविआ चे तीन उमेदवार आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी कोणाकडंही पुरेसं आमदारांचं संख्याबळ नसल्यानं सर्व कमान ही अपक्ष उमेदवारांच्या हाती होती. आणि अपक्षांना गळ घालण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये