मी शरद पवारांना घाबरत नाही, पण ‘या’ दोन नेत्यांना घाबरतो- शहाजीबापू पाटील
मुबंई – राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं असून आता विरोधी पक्षनेतेपदावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली आहे. या सत्तांतरादरम्यान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सर्व एकदम ओकेमध्ये असल्याचा डायलॉग ट्रेंड झाला होता. विधानसभेमध्ये अजित पवार यांनीही या डायलॉगचा उल्लेख केला.
शहाजीबापू पाटील यांनी अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, अजित पवारांनी मला खूप प्रेम दिलं. शरद पवारांनीही दिलं. त्यांच्यासोबत मी जीवनाचे 35 वर्षे राजकारणात काम केलं. मी अजित पवारांबद्दल कालही, आजही, उद्याही चांगलंच बोलणार असल्याचं पाटील म्हणाले.
दरम्यान, मी आयुष्यात शरद पवारांना देखील घाबरलो नाही. पण दोन माणसांना आयुष्यात घाबरतो, ते म्हणजे एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. काही ठरवून घाबरत नाही, मात्र त्यांना बघून नैसर्गिकच घाबरायला होत असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.