ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मी म्हटलं चला, हनुमान वाट बघत असेल…’- संजय राऊत

नाशिक : आज राज्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसंच मशिदींवरील भोंगा आणि हनुमान चालिसा याच्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ”मला कोणी बोलावले तर मी येतो. आज मला देवळात घेऊन गेले, हनुमान वाट बघत असेल म्हणून मी गेलो.” नाशिकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित, यावेळी ते असं म्हणाले आहेत.

यावेळी संजय राऊत म्हणाले, मला कोणी बोलावले तर मी येतो. आजपर्यंत डॉक्टर बोलवत नव्हते. मला जर कोणी प्रेमाने बोलावलं तर मी नक्की येतो. आज मला हे लोक देवळात घेऊन गेले. मी गेलो. आज हनुमान जयंती आहे, देवळात जायला हवं, असं हे (कार्यकर्ते) लोक म्हणत होते. मी म्हटलं चला, हनुमान वाट बघत असले तर आपण जाऊ. शेवटी प्रत्येकाची श्रद्धा आहे, असं ते म्हणाले. डॉक्टरांवर बोलताना राऊत म्हणाले, फॅमिली डॉक्टर पिढ्यान पिढ्या असतात. डॉक्टराची ही घराणेशाही असते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये