ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मी अयोध्येला जाणार…’- गुणरत्न सदावर्ते

मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पायाखालची वाळू घसरली. अयोध्येत आमचं साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असं पायदळी तुडवू शकत नाहीत. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये