“…तर यापुढे मी चित्रपटात काम करणार नाही”, ज्युनिअर एनटीआरनं घेतला मोठा निर्णय
मुंबई | Jr Ntr – सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाची. या चित्रपटानं इतिहास रचला आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्यानं ऑस्कर (Oscar) पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांचं जगभरातून कौतुक होत आहे. ऑस्कर पुरस्कार पटकवल्यावर कलाकार मायदेशात परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. अशातच अभिनेता जुनियर एनटीआरनं (Jr Ntr) मोठा निर्णय घेतला आहे.
जुनियर एनटीआर नुकताच हैदराबादमधील एक कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे त्याला एका चाहत्यानं आगामी प्रोजेक्टविषयी विचारलं असता त्यानं अद्याप कोणताही चित्रपट स्वीकारला नसल्याचं सांगितलं. तसंच चाहत्यांनी आगामी प्रोजेक्टविषयी सातत्यानं प्रश्न विचारल्यानंतर एनटीआरनं वैतागून ”मी अद्याप कोणताही चित्रपट स्वीकारला नाही. मात्र, जर सतत हा प्रश्न विचारला तर यापुढे मी चित्रपटात काम करणार नाही.” अशी प्रतिक्रया त्यानं दिली.
दरम्यान, जुनियर एनटीआर आता ‘एनटीआर 30’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केलं आहे. तसंच येत्या 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.