क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

स्मिथला विराटनं टाकलं मागं, आता रोहितही टाकणार? एक मोठी खेळी अन् दोघांचीही रँकिंगमध्ये उसळी

नवी दिल्ली : (ICC ODI Ranking Virat Kohli and Rohit Sharma) भारताने श्रीलंकेचा पहिल्या वनडेत 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावांची तर विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे दोघांनाही ICC ODI Ranking मध्ये चांगला फायदा झाली असून दोघांनी रँकिंगमध्ये उसळी घेतली आहे. विराट कोहलीने तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे.

विराट कोहलीने सलग दुसरे शतक ठोकत भारताच्या विजयात मोठी भुमिका बजावली. रोहित शर्माने देखील आक्रमक 83 धावा ठोकत भारताच्या 373 धावांचा डोंगराचा पाया रचला होता. या दोघांनाही त्यांच्या खेळीचा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. विराट कोहली आठव्या स्थानावरून दोन स्थान उसळी घेत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे 726 गुण झाले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला देखील मागे टाकले आहे. स्मिथ आता 719 गुण घेत सातव्या स्थानावर विराजमान आहे.

तर कर्णधार रोहित शर्माने देखील आपल्या वनडे रँकिंगमध्ये सुधारणा केली असून नवव्या स्थानावर विराट आधी ज्या स्थानावर होता त्या आठव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे 715 गुण झाले आहेत. याचाच अर्थ रोहितही ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला पिछाडण्याच्या तयारीत आहे. या दोघांच्या गुणांमध्ये फक्त चार गुणांचे अंतर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये