ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! कृषीमंत्र्यांनी पेरणीबाबत शेतकऱ्यांना केलं ‘हे’ आवाहन!

कोल्हापूर | Agriculture Minister Appeals To Farmer – सध्या राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसंच मान्सूनपूर्व सरी कोसळल्यानंतर राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला होता. मात्र आता मोसमी पाऊस हुलकावणी देत असल्यामुळे झालेली पेरणी संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी गडबड करु नये असं आवाहन केलं आहे. दादा भूसे हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दादा भूसे यांनी सध्या सुरू असलेल्या विधानपरिषद रणधुमाळीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचे पर्व आमदार आणि मंत्री आज संध्याकाळीच मुंबईत एकत्र जमतील. उद्या एकत्र येण्याचं नियोजन होतं. मात्र, आजच सर्वजण मुंबईत दाखल होतील, अशी माहिती दादा भूसे यांनी दिली आहे. तसंच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी म्हणावा तसा पावसाने अजून वेग पकडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, आतापर्यंत राज्यात केवळ दीड टक्के पेरणी झाल्याचं देखील ते म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये