देश - विदेश

मुंबै बँकेवर पुन्हा प्रविण दरेकरांची पुन्हा लागणार वर्णी?

मुंबई : (Pravin Darekar Chairman of Mumbai Bank) दिड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील सत्तांतर घडले. राज्यात ज्यांची सत्ता त्यांची मुंबई बॅंकेवर सत्ता असे समीकरण दिसत आहे. रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शविवार दि. 05 रोजी पार पडणार आहे. राज्यातील सत्तांतरामुळे मुंबई बॅंकेतही सत्तांतर होणार असून प्रविण दरेकर यांचे मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन होणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.

मविआ सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रविण दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं. मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणुकही पार पडणार असून त्यामध्ये भाजपचे नेते प्रविण दरेकर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

दिड महिन्यापुर्वी मुंबई बॅंकेवर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे होते, तर विठ्ठल भोसले हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर या दोघांकडून आपापल्या पदाचे राजीनामे दिण्यात आले होते. त्यामुळे आता प्रविण दरेकरांची पुन्हा अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये