“मराठी पाट्या लावा नाहीतर…”, इंग्रजी पाट्यांना काळं फासत मनसे आक्रमक; दिला गंभीर इशारा

नाशिक | MNS : सध्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे (MNS) चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये (Nashik) मनसेनं इंग्रजी पाट्यांविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. तसंच मनसैनिकांनी इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. तर मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असा इशार देखील मनसेनं दिला आहे.
आज सकाळी नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसंच मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असा गंभीर इशारा देखील मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
राज्यातील व्यापारी संघटनेला सर्वोच्च न्यायालयानं दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते. तर 25 नोव्हेंबर ही मराठी पाट्या लावण्याची अंतिम मुदत होती. असं असतानाही नाशिकमधील दुकानांवरील इंग्रजी पाट्या हटवल्या नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली होती.