पुण्यात भररस्त्यात एकानं घेतलं पेटवून, देवेंद्र फडणवीसांचा ताफा आला अन्…

पुणे | Pune News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील येरवड्यातील लूप रोड परिसरात एका व्यक्तीनं भररस्त्यात पेटवून घेतलं. तर याच रस्त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ताफा जाणार होता. त्यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. तर याच पोलिसांनी या व्यक्तीला त्वरित रूग्णालयात दाखल केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्यानं जाणार होता. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी येरवड्यातील लूप रोड परिसरात भररस्त्यात एका व्यक्तीनं अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा ताफा तेथून जाणार होता. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल केलं.
बबलू माणिक गायकवाड (वय 40) असं भाजलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, बबलू गायकवाड यांनी कौटुंबिक वादातून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.