ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

श्रीलंकेत हजारोंच्या संख्येने आंदोलक घुसले राष्ट्रपती भवनात; परिस्थिती हाताबाहेर !

कोलंबो (Shrilanka Economic Crisis) : मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेत आर्थिक स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शनिवारी लाखोच्या संख्येने नागरिकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यामुळे राष्ट्रपती गोतायाबा राजपक्षे यांना राजभवनातून पळ काढावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्यानंतर आंदोलकांनी भवनात प्रवेश केला.

श्रीलंकेतील वाढत चाललेली महागाई आणि आर्थिक संकटानं त्रस्त नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला चढवला. एएफपीच्या वृत्तानुसार श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान राणील विक्रमसिंघे यांनी तातडीची कॅबिनेट बैठक बोलवली आहे.

या आधीही मे महिन्यात संतप्त नागरिकांनी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानावर आंदोलन केलेलं होते. त्यांना देखील तेथून पळ काढावा लागला होता.

संतप्त आंदोलक राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळं त्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा वळवला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांत आणि आंदोलकांत झालेल्या चकमकीत अनेक नागरिक जखमी देखील झाल्याची माहिती आहे. परिस्थिती ताब्यात आणण्यासाठी सुरक्षारक्षकांनी अश्रुधुराचा प्रयोग केला आणि हवेत गोळ्या देखील झाडल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये