देश - विदेश

सावधान! कोरोना पुन्हा परततोय…राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | State Government On Genome Sequencing – देशातलं कोरोना (Corona Virus) संकट निवळत चाललं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या जीवघेण्या व्हायरसचं संकट घोंगावू लागलंय. चीन आणि पूर्व आशियामध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातला हा वाढता कोरोना संसर्ग पाहता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) करणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनेनुसार राज्य सरकारनं (State Government) हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग (Coronavirsu Outbreak) पाहता केंद्रांनं राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना राज्य सरकारनं गांभीर्यानं घेत नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागाचे (Maharashtra Health Department) वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे (Sanjay Khandare) यांनी सांगितलं की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना (Sample of Corona Patients) रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सध्या राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये