क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास! रोहित सेनेचा राजेशाही थाट

नागपूर : (IND vs AUS 1st Test) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने फक्त एकदाच फलंदाजी करत कांगारूंचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जरी भारताने एकाच डावात फलंदाजी केली असली तरी कांगारूंना 140 षटके तंगवले. दुसरीकडे दोन्ही डावात 97 षटकेच खेळलेल्या कांगारूंच्या बलाढ्य फलंदाजीला तीन दिवस देखील तग धरता आला नाही. त्यांचा अडीच दिवसातच बाजार उठला!

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर कांगारूंनचा दुसरा डाव 91 धावात संपवत दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे पहिल्या डावात कांगारूंनी 64 षटके तर धरला तर दुसऱ्या डावात 32 षटकेच खेळू शकले.

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाने त्याला विकेट्स घेत चांगली साथ दिली. फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले. भारताने दुसऱ्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी त्यांचा दुसरा डाव सुरू केला. मात्र भारताच्या फिरकीपुढे कांगारूंची टॉप ऑर्डरन पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. अश्विनने उस्मान ख्वाजा (5), डेव्हिड वॉर्नर (10) आणि मॅट रेनशॉ (2) यांची शिकार केली. तर रविंद्र जडेजाने मार्नस लाबुशाने (17) ची मोठी विकेट घेतली. अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला 6 धावांवर बाद करत कांगारूंची अवस्था 5 बाद 52 धावा अशी केली.

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि अॅलेक्स केरी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनने केरीला 10 धावांवर बाद करत आपली 5 वी शिकार केली. यानंतर रविंद्र जडेजाने कमिन्सला 1 धावेवर बाद करत कांगारूंची उरली सुरली आशा धुळीस मिलवली. दुसरीकडे स्मिथ डावाने पराभव टाळण्यासाठी एक बाजू लावून धरत होता. मात्र इतर फलंदाजी हजेरी लावून जात होती. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावात संपुष्टात आला. स्मिथने नाबाद 25 धावांची एकाकी झुंज दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये