चेन्नईत हरलो तर… केवळ मालिकाच नाही तर सत्ताही धोक्यात!
![चेन्नईत हरलो तर… केवळ मालिकाच नाही तर सत्ताही धोक्यात! Team India 5](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Team-India-5-780x470.jpg)
चेन्नई : (IND vs AUS 3rd ODI) सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्याची एकदिवशीय मालिका सुरू आहे. त्यामध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाने मुंबईच्या मैदानावर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये भारताचा दारून पराभव करत जोरदार पुनरागमन केलं. त्यामुळे तीन सामन्याची एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत आली.
आता तिसरा सामना हा चेन्नईत होणार असून दोन्ही संघासाठी ‘करे या मरो’ची लढाई असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाची बाजी लावणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील विजेता चेन्नईत निश्चित होणार आहे आणि आयसीसीचा नंबर 1 संघ देखील या सामन्याद्वारे निश्चित होईल.
सध्या टीम इंडिया हा वनडे आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाला आहे. मात्र जर भारताचा चेन्नईत कांगारूंकडून पराभव झाला तर त्यांच्या हातून मालिका तर जाईलच शिवाय, याव्यतिरिक्त नंबर 1 ची खुर्ची हिसकावून घेतली जाऊ शकतो. जर टीम इंडिया चेन्नईमध्ये हरली तर ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 113-113 रेटिंग गुण होतील. पण कांगारू आघाडीवर असेल कारण त्यांचे एव्हरेज गुण टीम इंडियाच्या पुढे जातील. अशा परिस्थितीत भारताला आपला नंबर 1 ताज वाचवायचा असेल, तर चेन्नईमध्ये विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.