देश - विदेश

भारत, चीन तणाव निवळण्यास सुरुवात; पूर्व लडाखमधून सैन्याची माघार

भारत आणि चीनमधील सीमेवरील तणाव निवळण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्व लडाखमधील डेमचॉक आणि डेस्पांग येथून दोन्ही देशांनी सैन्य माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सैन्य माघारी नंतर या भागात दोन्ही देशांत गस्ती पथक कार्यरत असतील. २८ आणि २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू होईल, त्यानंतर ३० आणि ३१ ऑक्टोबरला या दोन ठिकाणी गस्त सुरू होईल.

प्रिल २०२०ची स्थिती कायम होणार

सैन्य माघारीची प्रक्रिया सध्या फक्त या दोन ठिकाणीच होणार आहे. एप्रिल २०२०ला दोन्ही देशांची जी स्थिती होती, तेथेपर्यंत सैन्य माघारी घेतील, तसेच एप्रिल २०२०ला जेथेपर्यंत गस्त घातली जात होती, तेथेपर्यंत ही गस्ती पथक कार्यरत राहतील. तसेच दोन्ही देशांचे ग्राऊंड कमांडर नियमित एकमेकांशी संवाद साधणार आहेत.

गस्ती पथक तैनात

दोन्ही देशांकडून तैनात होणाऱ्या गस्ती पथकांत किती मनुष्यबळ असेल याचा आराखडा दोन्ही देशांनी मंजुर केला आहे आणि दोन्ही देशांनी याबद्दल एकमेकांशी संवाद साधलेला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले तात्पुरते शेड, तंबू हेही हटवण्यात येत आहेत. डेसपांग आणि डेमचोक येथे दोन्ही देशांचे लक्ष राहील, तर पेट्रोलिंग पॉईंटची स्थिती एप्रिल २०२०च्या पूर्वीची असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये