पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

भारत विश्वशांतीचा कैवारी : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : चीनच्या विस्तारवादाने तैवान सह तिबेटच्या अस्तित्वाला घायाळ केले, त्यामुळे चीनी हिटलरशाहीचा धोका समूळ विश्वशांतीला निर्माण झाला आहे. दलाईलामा यांना भारताने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणारी लढाऊ संघटना म्हणून परिचित असणार्‍या दलित पँथर संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे दलित पँथर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते बापू भोसले यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पँथररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर रमाई महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, शाहीर संभाजी भगत, रविंंद्र माळवदकर, डॉ. अमोल देवळेकर, लता राजगुरु आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, या कृतीतून भारत विश्वशांतीचा कैवारी असल्याचे सत्य पुन्हा सिद्ध झाले आहे. बापू भोसले पँथरचा वारसा असूनही विश्वशांतीच्या ध्यासात रमलेत.तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे. म्हणू Aनच त्यांना दलाई लामांनी बापूंना पुरस्कार प्रदान केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये