ऑस्ट्रेलियाने केला भारताला घाबरवण्याचा माइंड गेम्स; पण, आणली स्वतःचीच इज्जत चव्हाट्यावर

नागपूर : (India Vs Australia Test Series Match 2023) तोंडावर आलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. चार सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपूर येथे खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी दोन्ही संघाकडून सराव करण्यात येत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियन संघ सरावाव्यतिरिक्त माइंड गेम्सदेखील खेळत आहे, ज्यासाठी त्यांना नेहमीच ओळखलं जात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ पोस्ट करून टीम इंडियाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
जुन्या एका कसोटीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाची पारी अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आल्याचं दाखवले आहे. यावरुन कांगारू संघ माईंडगेम्स खेळत असल्याचे यातून दिसत आहे. या व्हिडिओमधून ऑस्ट्रेलिया संघ असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, आगामी मालिकेतही ऑस्ट्रेलिया संघ भारताची अशीच हालत करणार आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया संघाने पोस्ट केला खरा पण यामुळे कांगारू संघ चांगलच ट्रोल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारत ३६ धावांवर ऑलआऊट झाल्याचा व्हिडिओ पोस्ट केला, परंतु त्यानंतर चाहत्यांनी ही मालिका टीम इंडियाने जिंकल्याची आठवण करून दिली. व्हिडीओ ट्विटर पोस्ट करत भारताच्या त्या विजयाची आणि ऑस्ट्रेलियाला दिलेल्या त्या जखमेची भारतीय चाहत्यांनी चांगलीच आठवण करून दिली. या मालिकेत टीम इंडियाने गाबावर आपला दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.