क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पाकिस्तान रडकुंडीला! दुसऱ्या दिवशीही पाकची धुलाई; विराट-राहुलची नाबाद द्विशतकी खेळी, 357 धावांचं तगडं आव्हान

India vs Pakistan Asia Cup 2023 Super 4 : आशिया कप सुपर 4 मधील भारत पाकिस्तान सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. राखीव दिवशी भारताने आपला डाव 2 बाद 147 धावांपासून पुढे सुरू केला.

भारताच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने राखीव दिवशी पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली. वरूणराजाच्या कृपेमुळे भारतीय संघाला पाकिस्तानच्या गोलंदाजांना सलग दोन दिवस दमवले.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी (233) भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या. विकाट कोहलीने 94 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या तर केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.

भारताने पाकिस्तानविरूद्ध 356 धावसंख्या उभारली. ही पाकिस्तानविरूद्धची वनडेमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. यापूर्वी विशाखापट्टणम येथील सामन्यात देखील भारताने पाकिस्तानविरूद्ध 356 धावा ठोकल्या होत्या. विराट कोहलीने 122 तर केएल राहुलने 111 धावा ठोकत शतकी खेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये